जाणून घ्या आजचे राशिभविष्य | पुढारी

जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

मेष- वडिलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहिल. मानसन्मान होतील.
वृषभ- सरकारी कामे करताना अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. आरोग्याचा तक्रारी संभवतात. पश्चाताप होईल. आत्मचिंतनाची गरज.
मिथुन- अविचाराने वागू नका. संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.
कर्क-कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृती-रंजनामध्ये दिवस जाईल.
सिंह-सहकार्‍यांवर चांगुलपणाने मात कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. उत्तम आरोग्याचा दिवस.
कन्या-वादविवाद टाळावेत. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता आहे.
तूळ- घराविषयीच्या कामांमध्ये अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा.
वृश्चिक- लेखक, कलाकारांना वाव. मिळेल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.
धनु-दंतरोग उद्भवतील. आहारावर नियंत्रण ठेवा. सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
मकर-मनासारख्या, आनंददायी घटना. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग संभवतात.
कुंभ- कोर्टकचेरीच्या कामांमध्ये अडचणी. व्यवहारात सावधानता बाळगा. कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.
मीन- लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

Back to top button