Ganesh Utsav 2023 : श्री ज्ञानदेवाची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : श्री ज्ञानदेवाची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानिमित्त मिरवणुकींमध्ये ठिकठिकाणी शिवकालीन मर्दानी खेळ दांडपट्टा, लेझीम इत्यादी खेळले जात आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री ज्ञानदेवांची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥ आरती ॥धृ.॥

लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी ॥ आरती ॥१॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥ आरती ॥धृ.॥

कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरही साम गायन करी ॥ आरती ॥२॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥ आरती ॥धृ.॥

प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केले
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले॥ आरती ॥३॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥ आरती ॥धृ.॥

हेही वाचलंत का? 

Back to top button