WhatsApp यूजर्संसाठी महत्त्वाची बातमी! आता इंटरनेटशिवाय पाठवता येणार फोटो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंट्स

WhatsApp यूजर्संसाठी महत्त्वाची बातमी! आता इंटरनेटशिवाय पाठवता येणार फोटो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंट्स

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप येण्याआधी तुम्हाला फोटो, व्हिडिओ ब्लूटूथच्या माध्यमातून पाठवावे लागत होते. पण व्हॉट्सॲप आल्यानंतर फोटो, व्हिडिओ पाठवण्याचे काम सोपे झाले. आता व्हॉट्सॲप लवकरच तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट्स आणि बऱ्याच काही फाइल्स शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. याबाबतची अपडेट WABetaInfo ने दिली आहे. WABetaInfo हे WhatsApp च्या आगामी फिचर्सचा मागोवा घेणारे प्लॅटफॉर्म आहे.

WhatsApp चे नवीन फिचर फाइल्स शेअर करण्यासाठी ब्लूटूथवर अवलंबून असेल. यूजर्संना केवळ सेटिंग्जमधून त्यांचे ब्लूटूथ सुरु करावे लागेल आणि फाइल्स स्थानिक पातळीवर शेअर कराव्या लागतील. या फाइल्सदेखील प्लॅटफॉर्मवरील इतर मजकुरांप्रमाणे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील.

WABetaInfo अहवालात शेअर करण्यात आलेल्या लीक स्क्रीनशॉट्समध्ये हे फिचर कार्य करण्यासाठी ॲपला Android वर आवश्यक नेमक्या कोणत्या परवानग्या लागत्यात हे दिसून येते. विशेष म्हणजे फाइल्स ऑफलाइन शेअर करण्यासाठी, तुम्ही ज्या डिव्हाइससह फाइल्स शेअर करत आहात त्या डिव्हाइसमध्येदेखील हे ऑफलाइन फाइल-शेअरिंग फिचर असणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲपच्या आगामी अपडेटमध्ये हे फिचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या फिचरसह, यूजर्संनी ॲपमध्ये तीच स्क्रीन ओपन केली असेल आणि त्यांच्या डिव्हाइससाठी परवानगी दिली असेल तरच ते शोधण्यात सक्षम होईल; जेणेकरून दोन्ही कनेक्ट केले जाऊ शकतात. ही एक ऑप्ट-इन प्रक्रिया आहे; त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही सहजपणे तुम्हाला फाइल्स पाठवू शकणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पाठवणाऱ्याचे आणि प्राप्तकर्त्याचे फोन नंबर दिसणार नाहीत. यामुळे तुम्हाला अधिक गोपनियता मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यूजर्संना 'हे' असेल स्वातंत्र्य

या अहवालानुसार, "जवळपासच्या डिव्हाईसेसची ओळख पटवण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी आणि ते निर्धारित करण्यासाठी लोकेशन परवानगी आवश्यक आहे." यूजर्संना कोणत्याहीवेळी त्यांच्या फोन सेटिंग्जमधून या परवानग्या मागे घेण्याचे स्वातंत्र्य असेल. हे फिचर अद्याप विकसित टप्प्यावर असून ते कधी जारी केली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कॉन्टॅक्ट नोट्स फिचरचीही चर्चा

या फिचरव्यतिरिक्त, अशीही एक अफवा आहे की व्हॉट्सअॅप लवकरच एक कॉन्टॅक्ट नोट्स फिचर आणेल. हे यूजर्संना कॉन्टॅक्ट नोट्स save करण्याची सुविधा देईल. व्हॉट्सॲप बिझनेस यूजर्स भविष्यातील संदर्भासाठी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या ग्राहकांबद्दलची संदर्भ माहिती save करून या फिचरचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला फक्त चॅटमधील कॉन्टॅक्ट नावावर टॅप करायचे आहे आणि नंतर कॉन्टॅक्ट माहिती विभागात उपलब्ध नोट्स पर्यायावर टॅप करायला हवे, असे WABetaInfo अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news