फोक्सवॅगनने लाँच केली टाइगुन वर्षपूर्ती एडिशन | पुढारी

फोक्सवॅगनने लाँच केली टाइगुन वर्षपूर्ती एडिशन

नवी दिल्ली : फॉक्सवॅगनने आपल्या मिड साईज एसयूव्हीडब्लू टाइगुन मॉडेलला भारतात एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टाइगुन अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच केली आहे. भारतीय बाजारात ही नवी कार मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी करतील, असा दावा कंपनीचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी केला आहे.

फॉक्सवॅगनने गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये टाइगुन ही कार भारतीय बाजारात लाँच केली होती. सध्याच्या एडिशनपेक्षा आगळ्या रंगरूपात बनवून कंपनीने ही कार एका नव्या कलर थीमसह सादर केली आहे. कंपनीने दोन टर्बो इंजिन ऑप्शनसह फोक्सवॅगन टाइगुनची ऑफर दिली आहे. या दोन्ही इंजिनसह कंपनीने 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व्यतिरिक्त 1 लिटर इंजिनसह 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 1.5 लिटर इंजिनसह 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. याशिवाय कंपनीने या दोन्ही इंजिनांसह अ‍ॅक्टिव्ह सिलिंडर टेक्नॉलॉजी आणि इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी जोडली आहे. कंपनीने या एसयूव्हीडब्लूमध्ये सध्याच्या एसयूव्हीची सिक्युरिटी फिचर्स दिली आहेत. यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिव्ह्यू कॅमेरा यांसारखी फिचर्स उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button