आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : कामातील प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर चांगले यश येईल. महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास होईल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. आपण घेतलेल्या निर्णयात कुटुंबीय सहमत असतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. पैशाची बचत होऊ शकते.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : व्यापार-व्यवसायात फार धोका पत्करू नये. कामाच्या नवीन संधी येण्याच्या शक्यता. संधीचा फायदा घेण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या.
कर्क
कर्क

कर्क : दिवस अनुकूल नाही. कामाचा दबाव खूप राहील. कामामध्ये खूप अडचणी आल्यामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता. अध्यात्माकडे कल राहणार आहे.
सिंह
सिंह

सिंह : दिवस धावपळीचा असेल. महत्त्वाची कामे आज कराल. मित्रांच्या सहकार्यामुळे कामे सुरळीत होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आनंदी दिवस.
राशिभविष्य
कन्या

कन्या : दिवस सर्वतोपरी चांगला जाईल. महत्त्वाची कामे करून घ्या. सरकारी कामे पूर्ण करा. प्रयत्नात सातत्य असल्यास आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
राशिभविष्य
तुळ

तूळ : दृष्टिकोन सकारात्मक असेल. जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य व आनंद मिळेल. विरोधकांवर मात कराल. कुटुंबातील आयुष्य समाधानी असेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : गुंतवणूक करताना फार धोका पत्करू नका. दिवसात अडथळे येऊ शकतात. सातत्याने काम केल्यास कामामध्ये यश येण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
धनु

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कामामध्ये शांतपणा तसेच नियमितपणा ठेवा. जोडीदाराचे सहकार्य कमी मिळेल. नोकरीमध्ये दिवस ठीक असेल.
राशिभविष्य
मकर

मकर : नोकरीमध्ये दिवस चांगला राहील. जास्त काम पडले तरी हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. आपल्या वागण्याने शत्रू नामोहरम होतील.
कुंभ -
कुंभ

कुंभ : योजना कार्यान्वित होण्यासाठी अत्यंत चांगला दिवस. लेखक, कवी यांची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल असेल. नवीन संधीचा फायदा घ्या.
मीन
मीन

मीन : दिवस चांगला. योग्य दिशेने पावले पडत आहेत. करिअरमध्ये चांगले बदल होतील. नोकरीत समाधान लाभेल. अवघड परिस्थितीला सामोरे जाल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button