आजचे राशिभविष्य (दि. २९ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २९ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : कौटुंबिक प्रश्‍न सोडवण्यात दिवस जाईल. केलेल्या चुकांबद्दल पश्‍चात्ताप करण्याची वेळ येईल. अनावश्यक खर्च होईल. संवाद महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्‍वास निर्माण होईल. नवे धोरण आखाल. नव्या संधी चालून येतील. आर्थिकद‍ृष्ट्या प्रगतीकारक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : मनामध्ये विकल्प निर्माण होतील. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

कर्क : सुवार्ता कानावर येईल. खरेदी करण्याचे योग संभवतात. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. मित्रमंडळींबरोबर सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल.
सिंह
सिंह

सिंह : ईर्ष्या निर्माण होईल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्यची शक्यता. वादविवाद होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
कन्या

कन्या : पती-पत्नीमधील वाद मिटतील. वैवाहिकद‍ृष्ट्या सौख्यकारक दिवस. व्यावहारिक संतुलन साधाल. भरभराट होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
तुळ
तुळ

तुळ : आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. जबाबदारी वाढेल. मान-सन्मान होतील.
वृश्‍चिक
वृश्‍चिक

वृश्‍चिक : द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता.कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
धनु
धनु

धनु : आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राशिभविष्य
मकर

मकर : प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची साथ लाभेल. आपापसातील मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ- मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल.
मीन
मीन

मीन : मागील काही गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयमाने वागावे लागेल.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button