आपल आजचं राशिभविष्य (दि. २५ जून २०२२) | पुढारी

आपल आजचं राशिभविष्य (दि. २५ जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- पूर्वार्धात मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणुकीस चांगला दिवस. मनासारख्या घटना घडतील. प्रेमभाव निर्माण होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-पूर्वार्ध लाभदायक ठरेल. प्रसन्‍न व आनंदित वातावरण राहील. पूर्वी केलेली गुंतवणूक नुकसानकारक ठरेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

 

राशिभविष्य
कर्क
कर्क- योग्य दिशेने वाटचाल कराल. आनंद देणार्‍या घटना घडतील. आप्तस्वकीयांबरोबर संवाद होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. प्रवासाचे योग.

सिंह- प्रतिष्ठेला शोभणारे कार्य कराल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उन्‍नतीचे योग. सौख्यकारक दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या- जवळच्या व आवडत्या लोकांची आठवण येईल. भावनिक होण्याचे प्रसंग येतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. संयम महत्त्वाचा.
राशिभविष्य
तुळ
तुळ- आत्मविश्‍वासाचा अभाव. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता महत्त्वाची आहे. भागीदारीमध्ये लाभ होईल.

वृश्‍चिक- सुखकारक दिवस. थोड्याफार आरोग्याच्या तक्रारी. संवादाने कार्यसिद्धी होईल. व्यापाराच्या निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
धनु
धनु – शत्रू नामोहरम होतील. कृतज्ञता व्यक्‍त कराल. सज्जनांचा सहवास लाभेल. शारीरिक आणि मानसिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर- नोकरदार व व्यावसायिकांना नुकसानकारक दिवस. एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. अनावश्यक भीती निर्माण होईल.
कुंभ -
कुंभ
कुंभ – वाहनविषयक अडचणी निर्माण होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा. जमीन विषयक कामे रखडतील. आत्मविश्‍वास वाढेल.
राशिभविष्य
मीन
मीन -भावंडांकडून सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल. प्रयत्नांमुळे यशाकडे वाटचाल कराल.

Back to top button