आजचे राशिभविष्य (दिनांक १८ जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक १८ जून)

राशिभविष्य
मेष
मेष-स्थिर उपजीविका प्राप्त होईल. सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मानसन्मान होतील. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आत्मचिंतनाची गरज. खरेदीचे योग.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-बेफाम वागू नका. आरोप-प्रत्यारोप होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील. संतुलन साधणे महत्त्वाचे.

 

राशिभविष्य
कर्क
कर्क- कोर्टकचेरीच्या कामांत यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. प्रवासाचे योग. जुने मित्र भेटीचा योग. स्मृतिरंजनात दिवस जाईल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- शत्रू पीडा कमी होईल. विश्वासू वाटणारे चुकीचे वागतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. उत्तम आरोग्याचा दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या- समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ – वास्तुविषयीच्या कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा. अनावश्यक भीती निर्माण होईल. संवादाने मार्ग काढा.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – लेखक, कलाकारांना वाव. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.

 

राशिभविष्य
धनु
धनु – दंतरोग उद्भवतील. आहारावर नियंत्रण ठेवा. सामंजस्याने वागा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

 

राशिभविष्य
मकर
मकर – मनासारख्या आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.
कुंभ -
कुंभ
कुंभ – कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक प्रश्न सुटतील.

 

राशिभविष्य
मीन
मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

Back to top button