खंडाळा:  वीर धरण येथे गोळीबार, ९ जणांना अटक   | पुढारी

खंडाळा:  वीर धरण येथे गोळीबार, ९ जणांना अटक  

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : तोंडले (ता. खंडाळा) तालुक्‍यातील वीर धरण परिसरात दारु पिऊन रिव्‍हॉल्‍व्‍हरमधून गोळीबार करणार्‍या टोळक्‍याला शिरवळ पोलिसांनी अटक केली. सर्व संशयित हे पुणे जिल्‍ह्यातील बारामती व सातारा जिल्‍ह्यातील खंडाळा तालुक्‍यातील आहेत. या घटनेने खंडाळा तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

अधिक वाचा : सातारा : यवतेश्वर बंधाऱ्यामध्ये मुलगा बुडाला

याप्रकरणी किरण देविदास निगडे (वय ४६, रा. गुळूंचे ता. पुरंदर. जि. पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्‍ती, भादे ता.खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा. चोपडज, पोस्‍ट करंजे ता. बारामती. जि. पुणे),  माधव अरविंद जगताप (वय ३२, रा. वाकी पोस्‍ट करंजे ता. बारामती. जि. पुणे),  तात्‍याराम अर्जुन बनसोडे (वय ३८, रा. अंथुर्णे ता. इंदापूर जि. जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे(वय ३९, रा. चोपडज(सोमेश्‍वर) पोस्‍ट करंजे ता. बारामती. जि. पुणे),  योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा. राख ता. पुरंदर. जि. पुणे), वसंत नामदेव पवार (वय ४७, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर. जि. पुणे),अरविंद धनशाम बोदेले (वय ४१, रा. लवथळेश्‍वर,जेजूरी ता. पुरंदर. जि. पुणे, मूळ रा. भिवापूर जि. नागपूर) असे अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत. 

अधिक वाचा : सातारा : विनामास्‍क फिरणाऱ्याची होमगार्डलाच धक्‍काबुक्‍की

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी किरण निगडे याच्‍या मालकीची शासकीय परवान्‍याची मुदत संपलेली रिव्‍हॉल्‍हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्‍देमाल जप्‍त केला आहे. किरण निगडे आणि त्‍याचा मित्र योगेश रणवरे यांनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत माजविण्‍याचा प्रयत्‍न केला. या घटनेची माहिती मिळताच  शिरवळ पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. गोळीबार करणार्‍यांच्‍या मुसक्‍या आवळत पोलिसी खाक्‍या दाखविला. या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्‍याचे हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्‍यासह ९ जणांविरोधात राष्‍ट्रीय आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा, भारतीय शस्‍त्र अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत. 

अधिक वाचा : मराठा आरक्षणासाठी सीएम ठाकरे पीएम मोदींना भेटणार 

Back to top button