गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात ७१ बेपत्ता | पुढारी

गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात ७१ बेपत्ता

राशिवडे : प्रवीण ढोणे

जिल्ह्यातील 12 पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये फेब—ुवारी ते जून 2021 या पाच महिन्यांच्या कालावधीत 71 जण बेपत्ता असल्याच्या नोंदी आहेत. त्यापैकी सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातून 16 जण बेपत्ता झाले होते. 

जिल्ह्यातील एकूण 71 बेपत्तांपैकी 38 जण सापडले असून, 33 जणांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध न लागल्यामुळे खुनांच्या तपासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे चार खुनांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत आहे. पुरुष, स्त्री आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरण, वेडसरपणा आदी कारणांनी घराबाहेर पडून नागरिक बेपत्ता होत आहेत. फेब—ुवारी ते जून या पाच महिन्यांच्या दरम्यान जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 73 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यापैकी 38 जणांचा शोध लागला असून, 33 बेपत्ता असणार्‍यांंचा शोध सुरू आहे. सर्वाधिक बेपत्ता नोंदी हातकणंगले, कागल, शिरोळ, करवीर या ठाण्यांमध्ये झाल्या आहेत.

Back to top button