karnataka CM: येडियुराप्पांच्या राजीनाम्यामुळे लिंगायत मते फुटतील?

karnataka CM: येडियुराप्पांच्या राजीनाम्यामुळे लिंगायत मते फुटतील?

बंगळूर, पुढारी ऑनलाईन:भाजपचे ज्येष्‍ठ नेते आणि लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा असलेले येडियुराप्पा आज किंवा उद्या काळजीवाहू मुख्यमंत्री (karnataka CM)म्हणूनही पायउतार होतील. येडियुराप्पा (karnataka CM) यांच्या जाण्याने लिंगायत समाज नेमकी कोणती भूमिका घेऊ शकतो, याबाबत आता राजकीय विश्लेषकांना उत्सुकता लागली आहे.

अधिक वाचा:

बी. एस. येडियुराप्पा यांनी कुमारस्वामी यांचे सरकार पाडून नाट्यमयरित्या सरकार बदल केला. कर्नाटकातील भाजप सरकार हे येडियुराप्पा यांच्या मेहनतीचे फळ आहे, हे निर्विवाद.

काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे १४ आमदार फोडून त्यांनी सरकार पाडले होते. या १४ जणांना भाजपमध्ये घेऊन त्यांना विजयी केले होते.

सत्तेत आलेत्या दिवसापासून येडियुराप्पा यांना पक्षांतर्गत सामना सुरु झाला.

एकीकडे काँग्रेसचा विरोध आणि दुसरीकडे पक्षांतर्गत कुरबुरी असा दुहेरी सामना त्‍यांनी केला.

येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाना साधला आहे. लिंगायत मठाच्या प्रमुखांनीही भाजपला इशारा दिला आहे.त्यामुळे येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर लिंगायत मते काँग्रेसप्रमाणे भाजपपासून फटकून राहतील का? याबाबत मतमतांतरे आहेत.

चेहरा बदलून काहीच होणार नाही

काँग्रेसचे नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट केले असून 'येडियुरप्पा यांना 'जबरी सेवानिवृत्ती क्लब'मध्ये सदस्य केल्याचा आरोप केला आहे.

सुरजेवाला यांनी आरोप केला की, कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये डायबोलिकल कॅरेक्टर आहे. केवळ चेहरा बदलून काहीच होणार नाही.' असे ट्विट केले आहे.

अधिक वाचा:

संकटांचा सामना नेहमीच

गेल्या दोन महिन्यांपासून येडियुरप्पा राजीनामा देतील असे कयास बांधले जात होते. त्‍यांना सत्तेत आल्यापासून संकटांचा सामना करावा लागला होता.

कुमारस्वामी यांचे सरकार पाडताना काँग्रेसमधून आलेल्या १६ आमदारांना पुन्हा सत्तेत घेण्याचे आव्हान होते.

त्यांना आमदार करण्यासाठी त्यांनी स्वपक्षातील अनेकांना नाराज करावे लागले.

अधिक वाचा:

मुलाचा प्रशासनात हस्तक्षेप

येडियुरप्पा यांची कार्यशैली वेगळी आहे. लिंगायत समाजावर प्रभाव टाकणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

मात्र, त्यांच्या कार्यशैलीबद्दल भाजपमध्ये नाराजी होती. भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष असलेला त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र हा प्रशासनात हस्तक्षेप करत होता. त्यामुळे अनेकांची 'अडचण' झाली होती.

मात्र, बोलणार कोण? असा प्रश्न असल्याने अनेकजण गप्प होते.

त्यामुळे भाजपमधील ७५ वर्षांवरील निवृत्तीचा नियम लावत त्यांना पायउतार होण्याची वेळ आणली.

येडियुरप्पांचे समर्थक गप्प

सत्ता सोडण्याची वेळ आल्यानंतर बी. एस. येडियुराप्पा यांचे समर्थक गप्प असल्याचे दिसते.

येडियुराप्पा हे लिंगायत समाजातील प्रभावी नेते असल्याने त्यांचे अस्तित्व कायम असेल यात शंका नाही. मात्र, पक्षांतर्गत कुरबरी पक्षाची डोकेदुखी ठरणार आहे.

त्‍यांच्‍या गच्छंतीमुळे पक्षाची सर्वात मोठी व्होट बँक लिंगायतचा पाठिंबा कमी होण्याचा धोका आहे.

येडियुरप्पांपाठाेपाठ जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे प्रभावी नेते आहेत.

त्यामुळे पुढील काळात अनेक घडामोडी दिसू शकतात.

अधिक वाचा:

येडियुराप्पांना पाठिंबा

येडियुराप्पा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला लिंगायत मठाच्या प्रमुखांनी गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

लिंगायत जातीचे नेते काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील आणि शामानूर शिवसंकरप्पा यांनीही येडियुराप्पा यांना पाठिंबा दिला आहे.

ज्याप्रमाणे लिंगायत नेत्यांना काँग्रेसने दुखावले त्याप्रमाणे भाजपही करत आहे. त्यामुळे यापुढील काळात भाजपला सामना करावा लागेल, अशी चर्चा राजकीय वुर्तळात आहे.

ब्राह्मण मुख्यमंत्री चालेल का?

कर्नाटकात येडियुरप्पांइतका मोठा नेता भाजपमध्‍ये नाही. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेले प्रल्हाद जोशी यांचे नाव आघाडीवर आहे.

मात्र, त्यांचे लिंगायतांबरोबर जुळेल का? असा विचार केला जात आहे. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना त्यांना लिंगायत नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

मात्र, आता ती परिस्थिती नाही. येडियुरप्पा हे लिंगायत असले तरी 'नरम हिंदुत्ववादी' विचारसरणीचा नेता म्हणून ओळखले जातात. २०२३ च्या निवडणुकीत आरएसएसच्या कट्टर विचारांचा माणूस भाजपचे नेतृत्व करेल असे राजकीय विश्‍लेषक मानत आहेत.

येडियुराप्पांशिवाय पक्ष टिकेल

केवळ जातीय निकष लावून भाजप अडचणीत येईल, असे म्हणणे चुकीचे आहे असे एका भाजप नेत्याचे मत आहे. लिंगायत समजात अनेक गट आहेत. त्यामुळे ही एक व्होटबँक म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. त्यात अनेक गट कार्यरत आहेत. येडियुरप्पा यांच्याशिवाय पक्ष टिकू शकतो. परंतु त्यांना पक्षातून बाजूला केले जाऊ शकत नाही.

अधिक वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news