आलिया कश्यप : वडिलांशी सेक्स, प्रेग्नेंसीवर बोलल्यामुळे आलियावर प्रचंड टीका | पुढारी

आलिया कश्यप : वडिलांशी सेक्स, प्रेग्नेंसीवर बोलल्यामुळे आलियावर प्रचंड टीका

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिचं नाव स्टारकिड्सच्या यादीत येतं. आलिया कश्यप ही युट्यूब चॅनेलदेखील चालवते. मागील महिन्यात आलियाने आपला बाॅयफ्रेंड शेन ग्रेगोई याच्यासोबत भारतात आली होती, त्यावेळी व्ह्लाॅग्ज शेअर केला होता.

त्यामध्ये आलियाने आपल्या वडिलांसोबत म्हणजे अनुराग कश्यपसोबत सेक्स, ड्रग्ज आणि प्रेग्नेंसी या विषयांवर चर्चा केली होती. आलियाच्या या चर्चेवर सोशल मीडिया युजर्सनी कौतुक केले, तर काही लोकांनी खूप टीका केली.

आलिया कश्यप ही नुकतीच झूम चॅट शो By Invite Only या कार्यक्रमात गेलेली होती. यामध्ये तिने सोशल मीडियावर कंटेट तयार करण्यावरून चर्चा केली. त्याचबरोबर तिने असंही सांगितलं की, “सेक्स, ड्रग्ज आणि प्रेग्नेंसी या विषयावर माझे मत मांडल्यानंतर लोकांनी खूप टीका केली. तिरस्कारयुक्त मॅसेजस आले.”

आलिया म्हणते, “मला खूप मॅसेजस आले. ज्यात म्हंटलं होत की, माॅडर्न आई-वडील असंणही चांगली गोष्ट आहे. मुलांच्या मनात खूप प्रश्न असतात, ते आपल्या पालकांना विचारायला घाबरतात. अशावेळी ही पद्धत खूप चांगली आहे. पण, याची दुसरी बाजूही आहे. ज्यात या विषयांवर खुले विचार मांडणं सोयीचं मानलं जात नाही.”

“वडिलांशी संवाद साधताना जो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर लोकांनी केलेल्या प्रतिक्रिया वाचायला हव्या होत्या. मला माहीत नाही हे लोक माझ्या चॅनेलवर काय आले होते. माझ्यावर या लोकांनी खूप टीका केली. मला लोक म्हणाले की लाज वाटयला ही तुला… या विषयावर बोलताना”, असं तिनं सांगितलं. आलिया कश्यप हिला वाटतं की, आपले आई-वडील दोस्तासारखे असतात.

पहा व्हिडीओ : कोयना धरणातून सोडलेले पाणी लाल का आहे?

Back to top button