

नवी दिल्ली ;पुढारी ऑनलाईन : एकेकाळी मोबाईल फोन हा चैनीची गोष्ट मानला जायचा; पण काळाबराेबर त्याचे रुप बदललं. बघता बघता माेबाईल फाेन आपल्या जगण्यातील अत्यावश्यक भाग झाला. काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन आला आणि त्याच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. मागील काही वर्षांमध्ये मोबाईलचा वापरात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता काेणत्या देशातील लाेक किती काळ माेबाईलचा वापर करतात, याची पाहणी 'झीडीनेट'ने केली आहे.
अधिक वाचा
आज स्मार्ट फोनवरुन मोबाईल रिचार्ज, तिकिट बुकिंग, घरगूती सिलिंडर बुकिंग, बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरीत
आदी कामे केली जातात. त्याचबराेबर डीजिटल पेमेंटसह माहिती व मनाेरंजनासाठीही त्याचा वापर हाेताे. त्यामुळे आज मोबाईल वापराचा कालावधीही वाढला आहे, असे 'झीडीनेट'ने आपल्या पाहणी अहवालात नमूद केले आहे.
अधिक वाचा
कोणत्या देशामधील लोक सर्वाधिक काळ मोबाईल फोन वापरतात याची पाहणी करण्यात आली. यामध्ये ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. या देशातील लोक दररोज सरासरी पाच तास ४ मिनिटे मोबाईल फोन वापरतात. मोबाईल फोन वापरात फरक केवळ एक मिनिटांचाच असला तरी दुसर्या क्रमाकावर इंडोनेशिया आहे. येथील लाेक दरराेज सरासरी ५ तास ३ मिनिटे मोबाईल फोन वापरला जातो.
स्मार्ट फोन आल्यानंतर आपल्या देशातही मोबाईल वापराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. जगात मोबाईल वापरात भारत तिसर्या स्थानी आहे. आपल्याकडे सरासरी ४ तास ९ मिनिटे मोबाईलचा वापर होतो.
'झीडीनेट'ने १० देशांमध्ये पाहणी केली. माेबाईल वापरात चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. येथे ४ तास ८ मिनिटे मोबाईलचा वापर होतो. पाचव्या व सहाव्या स्थानी अनुक्रमे मॅक्सिको आणि तुर्की देश आहेत. येथे सरासरी ४ तास ५ मिनिटे व ४ तास ४ मिनिटे मोबाईल वापरला जातो. माेबाईल वापरात सातव्या ते दहाव्या स्थानी असणारे देश पुढीलप्रमाणे कंसात माेबाईल फाेन वापरचा कालावधी.
जपान (४ तास ४ मिनिटे), कॅनडा (४ तास १ मिनिटे), अमेरिका (३ तास ९ मिनिटे) ब्रिटन (३ तास ८ मिनिटे).
हेही वाचलं का ?