नवी दिल्ली ;पुढारी ऑनलाईन : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनाच्या आंदाेलनास पाठिंबा देत सोमवारी सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वत: ट्रॅक्टर चालवत संसद भवनात पोहोचले. मी शेतकर्यांचा संदेश संसदेत आणला आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर असलेल्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अधिक वाचा
नवीन कृषी विधेयक रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या आठ महिन्यांपासून टिकरी, सिंघु आणि गाजीपूर सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर शेतकरी संघटनांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे किसान संसद सुरु केली आहे. यामध्ये दररोज २०० शेतकरी सहभागी होत आहेत.
अधिक वाचा
केंद्र सरकारविरोधात शेतकरी संघटनांच्या आंदाेलनास समर्थन दर्शविण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वत: ट्रॅक्टर चालवत संसद भवनात पोहोचले. यावेळी त्याचबरोबर रणदीप सुरजेवाला आणि बी. बी. श्रीनिवास, दीपेंद्र हुड्डा होते. पोलिसांनी सुरजेवाला आणि श्रीनिवास यांना ताब्यात घेतले.
या वेळी राहुल गांधी म्हणाले, मी शेतकर्यांचा संदेश संसदेत आणला आहे.
केंद्र सरकार शेतकर्यांचा आवाज दडपत आहे. त्यांना काळे कृषी कायदे रद्द करावेच लागतील.
आंदोलक शेतकर्यांवर निराधार आरोप केले जात आहेत.
शेतकर्यांना दहशतवादी ठरवले जात आहे.
केंद्र सरकारने तयार केलेले नवे कृषी कायदे हे देशातील दोन ते तीन उद्योजकांसाठीच आहेत, असे आरोपही त्यांनी यावेळी केला.
कृषी कायदे रद्द केले जाणार नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या कायद्यांमध्ये काही बदल करायचे असतील तर चर्चा होईल. चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले होते.
सोमवारी जंतर-मंतरवरील किसान संसदमध्ये महिला सहभागी होणार आहेत.
महिला किसान संसदेच्या माध्यमातून भारतीय कृषी व्यवस्थेमधील महिलांचे स्थान, शेतकरी आंदोलनामधील महिलांची भूमिका मांडण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायदे आणि पेगासस हिरगिरी प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प आहे. दरम्यान, सोमवारी (दि २६) दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु झाल्यानंतर याच मुद्यांवर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली.
यावेळी झालेल्या गदारोळामुळे सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
हेही वाचलं का?