बेळगाव मनपा अर्थसंकल्प : स्वच्छतेसाठी महिन्याला सव्वाचार कोटी! | पुढारी

बेळगाव मनपा अर्थसंकल्प : स्वच्छतेसाठी महिन्याला सव्वाचार कोटी!

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या अर्थसंकल्पात स्वच्छ बेळगावचा नारा देण्यात आला असून त्यासाठी तब्बल 52 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ बेळगावच्या स्वच्छतेवर महिन्याला सव्वाचार कोटी आणि रोज 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 2018 साली हा खर्च 26 कोटी होता. म्हणजेच पाच वर्षांत फक्त कचरा उचलीचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीही बेळगाव शहरात स्वच्छता नसतेच, हे नेहमीचे दुखणे. महापालिकेला प्रामुख्याने मालमत्ता करातून सर्वाधिक 62 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असून तब्बल 484 कोटी 15 लाख 57 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सभागृहात मंजूर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही, ही बेळगावकरांसाठी एकच समाधानाची बाब.

महापालिका सभागृहात सोमवारी अर्थसंकल्प मंजुरीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती निवडणूक झाली नसल्यामुळे महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला. 2023-24 वर्षातील या अर्थसंकल्पात एकूण 484 कोटी 15 लाख 57 हजार रुपयांची मिळकत असून 484 कोटी 9 लाख 75 हजार रुपयांचा नियोजित खर्च असणार आहे.

अर्थसंकल्पात प्रामुख्याने स्वच्छ बेळगावचा नारा देण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्च स्वच्छतेवर करण्यात येणार आहे. तरतुदीनुसार 26 कोटी रुपये कचरा विल्हेवाटीसाठी असणार आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी

मराठीला पुन्हा डावलले

महापालिकेत पुन्हा मराठीची गळचेपी करण्यात आली. आजपर्यंतच्या इतिहासात त्रिभाषा धोरणाचा अवलंब करत आलेल्या महापालिकेत केवळ कन्नड भाषेतीलच अर्थसंकल्प नगरसेवकांना देण्यात आला. त्यावर म. ए. समिती नगरसेवकांनी आक्षेप घेत आक्रमकपणे मराठीतील अर्थसंकल्पाची मागणी केली. पण, महापौरांनी अर्थसंकल्प मराठीत तयार झाल्यानंतर देऊ, असे थातुरमातूर उत्तर देऊन विषय टाळला. केवळ कन्नडमधूनच अर्धसंकल्प सादर झाल्याने संतापलेल्या म. ए. समिती नगसेवक रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी सभागृहात मराठीतून अर्थसंकल्प का देण्यात आला नाही. आम्हाला कन्नड समजत नाही. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीतून अर्थसंकल्प देण्याची मागणी केली.

Back to top button