बेळगाव : वाहतूक कोंडीत वाद झाल्याने अल्पवयीन मुलावर चाकूहल्ला | पुढारी

बेळगाव : वाहतूक कोंडीत वाद झाल्याने अल्पवयीन मुलावर चाकूहल्ला

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : वाहतुक कोंडीत दुचाकी मागे पुढे घेण्यावरून तरुणांच्या दोन गटात वादावादी झाली. यामध्ये एका पंधरा वर्षाच्या तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना सोमवारी (दि.26) रात्री दहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर दोघे हल्लेखोर फरार झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनंतशयन गल्ली येथे सोमवारी रात्री वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत एका दुचाकीस्वाराला दुसऱ्या दुचाकीस्वाराने वाहन बाजूला घे, मला पुढे जायचे आहे असे म्हटले. यातून दोन्ही गटातील तरुणांमध्ये वाद सुरू झाला. दुचाकीवर दोघे असलेल्या तरुणांपैकी एकाने आपल्याकडील चाकू काढून ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी वरील एका पंधरा वर्षाच्या तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button