बेळगाव : अपघातात बालक ठार, कुटुंबातील चौघे जखमी | पुढारी

बेळगाव : अपघातात बालक ठार, कुटुंबातील चौघे जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कारची थांबलेल्या बसला धडक बसून कारमधील सहा वर्षाचे बालक जागीच ठार झाले, तर त्याचे आई-वडील व अन्य दोघे नातेवाईक जखमी झाले. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगीजवळील नरसिंगपूर ब्रीजवर हा अपघात घडला. सिद्दीक साजिद मुल्ला (वय 6) असे मृत बालकाचे नाव आहे.

जखमींमध्ये साजिद मुल्ला, जावेद मुल्ला, सिरीन मुल्ला व तलक मुल्ला या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. हे कुटूंब वडूजचे (जि. सातारा) असून त्यांचे नातेवाईक कित्तूर येथे राहतात. नातेवाईक वारल्याने ते कित्तूरला निघाले होते.

संकेश्‍वरहून बेळगावकडे निघालेली संकेश्‍वर डेपोची बस नरसिंगपूर ब्रीजवर बंद पडून थांबली होती. कारचालक साजिद मुल्ला यांना बसचा अंदाज आला नाही. त्यामुळे कारची थांबलेल्या बसला जोराची धडक बसली. समोर आईच्या मांडीवर बसलेला सिद्दीक जोरदार धडकेमुळे कारच्या काचेवर जाऊन आदळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत पावला.

 

Back to top button