बेळगाव : दुचाकी चोरी प्रकरणी तिघे अटकेत | पुढारी

बेळगाव : दुचाकी चोरी प्रकरणी तिघे अटकेत

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सौंदत्ती व कटकोळ पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दुचाकी चोरी केलेल्या तिघा चोरट्यांना अटक करुन त्यांच्या कडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या. सौंदत्ती पोलिसांनी ही कारवाई केली.

मुन्नवळ्ळी पंचलिंगेश्वर क्रॉस येथून दुचाकी चोरी झाल्या प्रकरणी गंगाधर रामप्पा यांनी सौंदत्ती पोलिस स्थानकात तक्रार दाखल दिली होती. यावरुन पोलिसांनी तपास हाती घेतला होता. या प्रकरणी दि. 19 रोजी तिघा चोरट्यांना अटक करुन चौकशी केल्यानंतर त्यांनी कटकोळ पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 5 व सौंदती पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 अशाप्रकारे 8 दुचाकी चोरी केल्याचे उडकीस आले. त्यांच्याकडून 4 लाख किमतीची वाहने जप्त करुन कारवाई करण्यात आली. रामदुर्ग डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक एम. आय. नडवीनमनी, उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व सहकार्‍यांनी कारवाईत भाग घेतला होता.

मालदिन्नीत दुचाकीचोराला अटक
मालदिन्नी क्रॉस (ता. गोकाक) येथे दुचाकीवरुन जाणार्‍याची तपासणी करत असताना संशय आल्याने अधिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर संशयिताकडे चोरीच्या 1 लाख 10 हजार किमतीच्या चार दुचाकी असल्याचे आढळले. त्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित दुचाकीचोरानेे दुचाकीची कागदपत्रे व योग्य माहिती दिली नसल्याने चौकशी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाल राठोड, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. आर. खिलारे यांनी व सहकारी पोलिस कर्मचार्‍यांनी कारवाई केली.

Back to top button