बेळगाव : मोदगा येथील पूल पंधरा दिवसांपासून पाण्याखाली | पुढारी

बेळगाव : मोदगा येथील पूल पंधरा दिवसांपासून पाण्याखाली

दड्डी; पुढारी वृत्तसेवा :  मोदगा ता.हुक्केरी येथील घटप्रभा नदीवरील पूल मागील 15 दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. यामध्ये मरणहोळ गावाचा संपर्क तुटला आहे.

याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. येथून मोदगा हास्कूलना अनेक विद्यार्थी येतात. पूल पाण्याखाली गेल्याने मुलांना सलामवाडीकडून फिरुन पायपीट करावी लागत आहे.

शेतकर्‍यांनाही याचा फटका बसला आहे. डोंगरामध्ये शेळ्या चारण्यासाठी घेऊन सलामवाडी पुलावरुन जावे लागत आहे. मागील तीन वर्षांपासून झुलता पूल बंद असल्याने मोदगे ते मरणहोळ गावाची गैरसोय होत आहे.

Back to top button