Burning Car : कोल्हापुरात शॉर्ट सर्किटने पेटली कार | पुढारी

Burning Car : कोल्हापुरात शॉर्ट सर्किटने पेटली कार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : Burning Car : टेंबलाईवाडी विद्यालयासमोर मोटारीने अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. चालक जितेंद्र भानजी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे ते बचावले. मोटार जळून खाक झाली आहे.

चालक भानजी साई एक्सटेन्शन इथले रहिवासी असून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. उचगाव मार्गे कोल्हापूरला परत येत असताना गाडीतून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोटार रस्त्याकडेला थांबवताच आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Back to top button