Gold Price Update : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Price Update : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Update : सणासुदीनंतर सोन्याची झळाळी कमी होताना दिसत आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम (प्रति तोळा) ४९,०६१ रुपयांवर आला. तर २२ कॅरेट सोने ४८० रुपयांनी स्वस्त होऊन ४४,९४० रुपये झाले आहे. तर चांदी प्रति किलोमागे ५०८ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सराफा बाजारात आज बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ४९,०६१ रुपयांवर आला. मंगळवारी सोन्याचा दर ४९,५५३ रुपयांवर पोहोचला होता. आज त्यात घसरण दिसून आली. सराफा बाजारात २३ कॅरेट सोने ४८,८६५ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,९४० रुपये, १८ कॅरेट सोने ३६,७९६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,७०१ रुपये होता. (हे बुधवार दि. १७ नोव्हेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो).

Gold Price Update : शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष |balasaheb Thackeray

Back to top button