क्लासिक स्टाईल… Yamaha 150cc लॉन्च; जाणून घ्या भन्‍नाट फिचर | पुढारी

क्लासिक स्टाईल... Yamaha 150cc लॉन्च; जाणून घ्या भन्‍नाट फिचर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानच्या Yamaha कंपनीने 150cc क्लासिक स्टाईल मोटारसायकल लॉन्च केली आहे. या नव्या बाईकचा पोर्टफोलिओ अपडेट करण्यात आला आहे. कंपनीने ही बाईक GT150 Fazer या नावाने चीनी बाजारात लॉन्च केली आहे. भारतात ही बाइक लवकरच पहायला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

Yamaha 150cc मध्‍ये काय आहे खास ?

Yamaha GT150 Fazer 150 cc इंजिनने सुसज्ज असेल. ही बाईक व्हाईट, डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकला स्पोर्टी लूक देण्यासाठी फेंडर्स, अलॉय व्हील्स, एक्झॉस्ट, इंजिन आणि फ्रंट आणि रिअर सस्पेंशन देण्यात आले असून, त्यांचा रंग काळा ठेवण्यात आला आहे. राऊंड हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर आणि टर्न सिग्नल्स सारखे सिग्नेचर रेट्रो बिट्स बाइकला क्लासिक लुक देतात. याशिवाय, बाइकला ऑल-एलईडी लाइट्स, 12V DC चार्जिंग सॉकेट, फोर्क गेटर्स, टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, क्विल्टेड पॅटर्नमधील टॅन लेदर सीट्स आणि ट्रॅकर स्टाइल साइड पॅनल्स देखील मिळतात.

लांब आणि आरामदायक आसन

ही बाईक दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्याच्या सीटची उंची 800 मिमी आहे. या बाइकवर दोघेजण बसण्याची आसन क्षमता आहे. सीट लांब आणि आरामदायक देखील आहे. मात्र, एक ग्रॅब रेल गायब आहे. बाईक अगदी सौम्य ऑफ-रोड परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. भारतात Yamaha 150cc लवकर येईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. यानंतरच याची भारतातील किंमत स्‍पष्‍ट होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button