Jeremy Renner : ‘ॲव्हेंजर्स’ फेम अभिनेता जेरेमी रेनर अपघात गंभीर जखमी, ३० हाडे फॅक्चर | पुढारी

Jeremy Renner : 'ॲव्हेंजर्स' फेम अभिनेता जेरेमी रेनर अपघात गंभीर जखमी, ३० हाडे फॅक्चर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ॲव्हेंजर्स’ फेम अभिनेता जेरेमी रेनर (वय ५२) (Jeremy Renner) यांचा नुकताच स्नो प्लोईंग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना अनेक गंभीर दुखापत झाली असून ३० हाडांना फॅक्चर झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्‍यात आली आहे.

या वेदनादायक अपघातात ३० हून अधिक हाडे मोडल्याची माहिती जेरेमी रेनर (Jeremy Renner) यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते बेडवर पडून व्यायाम करताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘माझा सकाळचा व्यायाम, माझे संकल्प सर्व काही या नवीन वर्षात बदलले. या अपघातामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या; पण त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली. मी माझ्या कुटुंबाचे आणि त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. या घटनेनंतर ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मला मेसेज पाठवले. ही ३० हून अधिक तुटलेली हाडे बरे होतील, मजबूत होतील, ज्याप्रमाणे कुटुंब आणि मित्रांसोबतचे प्रेम आणि नाते अधिक घट्ट होईल.

Jeremy Renner : अपघात कसा झाला ?

जेरेमी रेनर नेवाडा येथील त्याच्या घरी एका स्नो ग्रूमरद्वारे रस्त्यावर अडकलेल्या नातेवाईकाची कार काढण्यात मदत करत होता. यादरम्यान त्यांना एक अवजड वाहनाने जोराची धडक दिली. त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जेरेमी रेनर हे हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आहेत. हर्ट लॉकर, दहमर, विंड रिव्हर, एव्हेंजर्स एंडगेम आणि मिशन इम्पॉसिबल यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारलेली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button