मेट्रोचे साहित्य अंगावर पडल्याने कामगार ठार | पुढारी

मेट्रोचे साहित्य अंगावर पडल्याने कामगार ठार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या कामाचे लोखंडी साहित्य अंगावर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कास्टिंग यार्डमध्ये शुक्रवारी (दि. 31) सकाळी हा अपघात झाला.

किम जोंग उनचा नवा लूक आला समोर!

अल्बक्ष शेख (वय 26, पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवडचे कास्टिंग यार्ड पिंपळे सौदागर येथील कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ आहे.

घंटी वाजवून, द्राक्षे खाऊनही नव्या वर्षाचे स्वागत!

मयत अल्बक्ष शेख हा मागील काही दिवसांपासून कास्टिंग यार्डमध्ये काम करीत होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने काम सुरू असताना अचानक लोखंडी साहित्य खाली कोसळले. यातील एक लोखंडी सळई शेख यांच्या डोक्यात पडली.

व्हिडिओ : रवी शास्त्रींचा रणवीर सिंह सोबतचा भन्नाट डान्स व्हायरल

त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.शेख यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

Back to top button