Kalicharan Maharaj : “अकोलातील कालीचरण महाराज फर्जीबाबा” | पुढारी

Kalicharan Maharaj : "अकोलातील कालीचरण महाराज फर्जीबाबा"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधीमंडळाच्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांबाबत कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेमधील सर्व पक्षाच्या नेत्यांनी मलिकांच्या मागणीचे समर्थन केले.

विधानसभेमध्ये नवाब मलिक म्हणाले, “अकोल्याचा कालीचरण महाराज हे ‘बोगस महाराज’ आहेत, असे सांगून त्यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारधारेला ठेच पोहोचवली आहे. इतकंच नाही तर त्यांना म. गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे कौतुकही केले आहे. या महाराजाविरोधात देशद्रोहचा खटला भरविण्यात यावा आणि त्याला अटक करण्यात यावी”, अशी मागणी नवाब मलिकांनी केली.

“राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा (Kalicharan Maharaj) अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे. संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले. तो कार्यक्रम कुठेही झाला असेल, तो अकोल्याचा रहिवासी आहे. बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही”, असेही नवाब मलिकांनी म्हंटलं आहे.

महात्मा गांधी यांच्यासंदर्भात कालीचरण महाराज काय म्हणाले होते?

धर्मगुरू कालीचरण महाराज महात्मा गांधी यांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरताना म्हणाले की, “नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीची हत्या करून योग्य पाऊल उचलले. इस्लाम धर्माचे लक्ष्य हे राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर नियंत्रण ठेवणं आहे. आपल्या डोळ्यांदेखत १९४७ साली राष्ट्रावर नियंत्रण मिळवलं होतं. यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवलं होतं. राजकारणाच्या माध्यमातूनही पाकिस्तान आणि बांगला देशावर नियंत्रण मिळवलं. मी नथुराम गोसडे यांना सलाम करतो. कारण, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली.” त्यांच्या या विधानावर उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून दुजोरा दिला होते.

पहा व्हिडीओ : कोल्हापूरपासून अगदी जवळ असणारं निसर्गरम्य परिसरातील मंदीर

Back to top button