Footballer Death : मॅच सुरू असतानाच ‘या’ फुटबॉलपटूला मृत्यूने गाठले! (Video) | पुढारी

Footballer Death : मॅच सुरू असतानाच ‘या’ फुटबॉलपटूला मृत्यूने गाठले! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रीडा विश्वातून एक धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. फुटबॉल मैदानात सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने एका खेळाडूचा मृत्यू (Footballer Death) झाल्याची घटना अल्जेरियामध्ये घडली आहे. सोफियान लुकर (Algerian footballer Sofian Lauker) असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. त्याचे वय अवघे २८ वर्षे होते. होम सेकंड डिव्हिजनच्या सामन्यादरम्यान सोफियान त्याच्याच गोलकीपरला धडकला. त्यानंतर त्याला झटका आला आणि त्यातूच त्या खेळाडूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या अल्जेरिया या देशात अल्जेरिया लीग-२ स्पर्धा खेळवली जात आहे. या अंतर्गत मौलौदिया सैईदा आणि एएसएम ओरन क्लब यांच्यात सामना खेळवला जात होता. सोफियान मौलौदिया सईदा संघाकडून खेळत होता. ब गटातील या सामन्यात पूर्वार्धाचा खेळ सुरू होता. यादरम्यान सोफियान लुकरची त्याच्याच गोलकीपरशी टक्कर झाली. त्यानंतर लगेच काहीच झाले नाही. लुकरला संघाच्या वैद्यकीय पथकाने मैदानावर उपचार दिले. त्यामुळे तो पुन्हा खेळण्यास तयार झाला. उपचारानंतर लुकर पुन्हा खेळण्यासाठी सरसावला. (Footballer Death Algerian footballer Sofian Lauker)

मैदानावर आल्यानंतर 10 मिनिटांनी हृदयविकाराचा झटका…

उपचारानंतर मैदानात आल्यावर तो थोडा थकल्या सारखा वाटत होता. पण धडक झाल्याने तसे असेल असा अंदाज सर्वांनी आणि स्वतः सोफियाने बांधला. पण अवघ्या 10 मिनिटांनी सोफियान लुकर अचानक मैदानावरच कोसळला. तात्काळ त्याचे संघ सहकारी सोफियान जवळ पोहचले. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण बेशुद्ध झाला होता. वैद्यकीय पथकाने रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सोफियानला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या मृत्यूनंतर दोन्ही संघांचे खेळाडू पूर्णपणे खचले. यानंतर सामना रद्द करण्यात आला. (Footballer Death Algerian footballer Sofian Lauker)

सामना रद्द होईपर्यंत मौलौदिया सईदा संघाने ओरान संघविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती. सोफियान लुकरही त्याच्या संघाचा कर्णधार होता. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत सर्व खेळाडू रडताना दिसत आहेत. (Footballer Death Algerian footballer Sofian Lauker)

Back to top button