Quinton De Kock catch : डी कॉकने मयंक अग्रवालचा ‘लॉलिपॉप’ कॅच सोडला, अन्… (Video) | पुढारी

Quinton De Kock catch : डी कॉकने मयंक अग्रवालचा ‘लॉलिपॉप’ कॅच सोडला, अन्... (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी चांगल्या स्ट्राईक रेटने तसेच नवीन चेंडू खेळून काढत धावा केल्या. राहुल आणि मयंकने टीच्चून फलंदाजी करत द. आफ्रिकन गोलंदाजांना फेस आणला. (Quinton De Kock catch)

द. आफ्रिकेच्या मैदानावर ११ वर्षानंतर भारताच्या या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी २०१० मध्ये गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी १३७ धावांची सलामी दिली होती. तर वर्ष २००० नंतर ही तिसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय सलामीवीरांनी द. आफ्रिकेच्या मैदानावर एका डावात ५०+ धावांची भागिदारी केली आहे. भारताच्या सलामीच्या जोडीने आफ्रिकेत शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. दिनेश कार्तिक आणि वसीम जाफर यांनी पहिल्यांदा १५३ धावांची भागिदारी केली होती. यानंतर गंभीर-सेहवाग आणि आता मयंक-राहुल या जोडीने हा पराक्रम केला आहे. (Quinton De Kock catch)

पहिल्या सत्रात मयंकने १८ व्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार मारले. यानंतर मार्को जॅन्सेनच्या चौथ्या चेंडूवर मयंकला जीवदान मिळाले. ऑफ-स्टंपवर पडताना, स्विंग झालेला चेंडू मयंकच्या बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि डी कॉकने (Quinton De Kock catch) उजवीकडे झेपावत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला झेल पकडता आला नाही. क्विंटन डी कॉकने मयंक अग्रवालचा ‘लॉलिपॉप’ कॅच सोडल्याने त्यावर सोशल मीडियात टीका होत असून भारतीय चाहते त्याचे आभार मानत आहेत. कारण, यावेळी मयंक ३६ धावांवर खेळत होता. या जीवदानाच्या जोरावर पुढे त्याने अर्धशतकी खेळी साकारली. (Quinton De Kock catch)

दरम्यान, मयंकचा सोपा झेल सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कॅम्पमधील निराशा दिसून आली. मयंकने जॅन्सनच्या २९.१ व्या षटकात चौकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला मजबूत स्थितीत पोहचवण्यात मोठा वाटा उचलला. मयंक अग्रवालने आपले सहावे कसोटी अर्धशतक ८९ चेंडूत पूर्ण केले. द. आफ्रिकेविरुद्ध त्याचे हे पहिले तर परदेशी भूमीवरील ५ वे अर्धशतक आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र, यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचून कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. (Quinton De Kock catch)

पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत श्रेयस अय्यरला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर हनुमा विहारीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

Back to top button