Ajinkya Rahane : ‘भारतीय क्रिकेट व्यवस्थेत सर्वात शक्तिमान अजिंक्य रहाणे!’, प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने चाहते संतप्त

Ajinkya Rahane : ‘भारतीय क्रिकेट व्यवस्थेत सर्वात शक्तिमान अजिंक्य रहाणे!’, प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने चाहते संतप्त
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेअंतर्गत (IND vs SA) पहिली कसोटी आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवली जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या नजरा भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर होत्या आणि या यादीत पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) नाव आल्याने चाहत्यांचे नाराज झाल्याचे दिसत असून ट्विटर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रहाणेचा फॉर्म बर्‍याच दिवसांपासून खराब चालला आहे आणि अशा परिस्थितीत रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या हनुमा विहारी किंवा श्रेयस अय्यरला संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. संघ व्यवस्थापनाने रहाणेला द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी दिली असून त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाल्याचे पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या. या बातमीत काही ट्विट वाचकांसाठी उपलब्धकरून देत आहोत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी (IND vs SA) साठी भारतीय XI बद्दल चर्चा सुरू होती. भारतीय संघात खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या खेळाडूंना संधी मिळेल की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी पहिल्या कसोटीत अंतिम ११ चा संघ कसा असेल याबाबत भाकित करत पहिल्या सामन्यासाठी रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे खूप कठीण जाईल, असे म्हटले होते. पण प्रत्यक्ष सामन्याच्या सुरुवातीआधी संघ व्यवस्थापनाने अनेकांना धक्का दिला. आणि रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. रहाणे (Ajinkya Rahane) वर्षभरात फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरला असून त्याला संघातून वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. अलीकडेच त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news