चीन करणार हाेता माणूस-चिंपांझीच्या संकरातून 'ह्युमांझी'ची निर्मिती! | पुढारी

चीन करणार हाेता माणूस-चिंपांझीच्या संकरातून 'ह्युमांझी'ची निर्मिती!

लंडन, पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन अमानवी वैज्ञानिक प्रयोगांसाठी (ह्युमांझी )दुनियेत बदनाम आहेच. चीनने ६०च्‍या दशकात असाच एक खतरनाक प्रयोग केल्‍याची धक्‍कादायक माहिती समाेर आली आहे.  चीनच्या एका संशोधकाने दावा केल्यानुसार वैज्ञानिकांनी चिंपांझी आणि मानवाच्या संकरातून ह्युमांझी विकसित करण्याचा प्रयत्न केला हाेता.

ह्युमांझी विकसित करण्‍यासाठी मानवी शरीरातील वीर्य हे मादी चिंपाझीच्या गर्भाशयात सोडले होते.
त्यावेळी चिंपांझी मादी गर्भवती राहिली मात्र, काही काळाने तिचा मृत्यू झाला. ती तीन महिन्यांची गर्भवती होती.

‘द सन’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, १९८० च्या दशकात एका चिनी वृत्तपत्राशी बोलताना डॉ. जी. योंगजियांग यांनी एक दावा केला होता की, माणूस-चिंपांझीच्या संकरातून   ‘ह्युमांझी’ची निर्मितीचा प्रयत्‍न चीनने केला हाेता.  ही तयार केलेली मानवी प्रजात ही माणसांशी बोलू शकेल आणि जनावरांपेक्षा बुद्धिमान असेल. या प्रजातीचा उपयोग शेतीची कामे, गाड्या चालवणे, अंतराळ संशोधन, समुद्रातील तेलाचा शोध घेण्यासाठी केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर अतिशय धोकादायक असलेल्या खाणींमधील कामासाठी करण्‍यात येणार हाेता.

मोठे डोके आणि तोंडचा माणूस

चीनमधील हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्यच ठरलं असतं. डॉ. जी पेशाने सर्जन आणि या प्रयोगात जे दोन डॉक्टर होते त्यापैकी एक होते. मात्र, हा प्रयोग यशस्वीतेकडे जाणार इतक्यात सांस्कृतिक क्रांती झाली. त्यात डॉ. जी. यांना प्रतिक्रांतीकारी ठरवून त्यांना १० वर्षे एका शेतात काम करायला पाठवले. १९६७ मध्ये शांघायमधील प्रयोगशाळा नष्ट झाल्यानंतर हा प्रयोग थांबविण्यात आला. यावेळी संशोधकांवर हल्ला करून त्यांना पकडण्यात आले. त्यामुळे गर्भवती असलेल्या चिंपांझीची देखभाल झाली नाही. तिचे हाल झाल्याने मृत्यू झाला.

डॉ जी यांच्या म्हणण्यानुसार. या योजनेचे प्राथमिक लक्ष्य होते ते एक मोठ्या डोक्याचा आणि तोंडाचा प्राणी विकसित  करण्‍याचे. चिंपांझी माणसाचा आवाज काढू शकत नाहीत कारण त्यांचे तोंड पसरट असते. १९८० च्या दशकात विज्ञान अकादमीच्या अनुवंशिक संशोधन विभागाच्या के ली गुओगम म्हणाले की, अशा प्रयोगांची योजना तयार केली होती. माझे वैयक्तिक मत आहे की, हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. कारण, सामान्य जैविक भेदांनुसार पुरुष आणि वानर एकाच श्रेणीतील आहेत. आम्ही सांस्कृतिक क्रांतीच्या आधी एक प्रयोग करून पाहिला; पण आम्हाला रोखले गेले.

शोधामागील कारण

चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सच्या अन्य एका संशोधकाने सांगितले की, फ्रँकस्टीन शैलीचा हा प्रयोग पुन्हा सुरू करण्याची योजना होती. मात्र, एकच शंका आहे की, असे कधी शक्य आहे का? ह्युमांझी शब्द २० व्या शतकात प्रचलित झाला. हा मानव आणि चिंपांझीच्या क्रॉसब्रीडसंदर्भात वापरला गेला. हा शोध  सिद्ध करू इच्छित होते की, मनुष्य आणि वानर हे अनुवंशिक दृष्ट्या एकत्र मुले जन्माला घालू शकते.

रशिया निर्माण करणार होते अजिंक्य प्रजात

रशियाने काही वर्षांपूर्वी असाच एक प्रयोग केला होता. जोसेफ स्टॅनिलने प्रसिद्ध वैज्ञानिक इलिया इवानोवच्या लाल सेनेच्या सैनिकांना एक अजिंक्‍य प्रजात तयार करण्याचा आदेश दिला होता. क्रेमलिन प्रमुखाने या प्रजातीला लवचिक आणि भूक नसलेली तयार करण्यास सांगितले होते. तसेच ते अधिक ताकदवान आणि कमी बुद्धी असलेले असावे, अशीही मागणी केली होती. मात्र यामध्‍ये रशियाला यश आले नाही.

हेही वाचा : 

Back to top button