जळगाव : वीज ग्राहकाची महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, पुढारी वृत्तसेवा
थकबाकीदार ग्राहकाची वीज खंडीत करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांला शिवीगाळ करून तिच्या सहकाऱ्याला ग्राहकाने मारहाण केली. ही घटना चाळीसगाव शहरातील गजाननवाडीतमध्ये घडली. याप्रकरणी योगेश रमेश चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील गजाननवाडीतील योगेश रमेश चौधरी या ग्राहकाचे वीज बिल थकीत होते. त्याला महावितरणकडून बिल भरण्याबाबत वारंवार सांगण्यात आले होते. नियमानुसार २४ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास महावितरणचे काही कर्मचारी वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेले. त्यांनी कनेक्शन खंडीत केल्याने ग्राहक योगेश चौधरी याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून त्यांचा दुसरा सहकारी शिरीष मराठे यांना मारहाण केली.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात योगेश चौधरी याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी आरोपी चौधरी याला ताब्यात घेतले असून, तपास सहायक पाेलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.
हेही वाचलं का?
- Farm Laws : फक्त एक पाऊल मागे घेतले आहे, कृषी कायदे पुन्हा आणण्याचे कृषी मंत्र्यांनी दिले संकेत
- मैत्रीचा अर्थ स्त्री शरीरसुखासाठी उपलब्ध आहे, असे नाही : कोर्ट