‘पिंकीचा विजय असो’ : मालिकेतून उलगडणार अतरंगी सतरंगी पिंकीची गोष्ट | पुढारी

'पिंकीचा विजय असो' : मालिकेतून उलगडणार अतरंगी सतरंगी पिंकीची गोष्ट

पुढारी ऑनलाईन

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’ १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता सुरू होतेय. आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘पिंकी हे कुतुहल निर्माण करणारं पात्र आहे. जगण्याची उर्मी देणारं, परिस्थितीला न घाबरणारं आणि सतत विजयी कसं होता येईल याचा ध्यास असणारं. सध्याच्या परिस्थितीतअसं पात्र रसिकांचं मनोरंजन करेल तसंच स्फुर्ती सुद्धा देईल.’

तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका १७ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

Back to top button