सातारा : शिंगणापूर घाटात ४०० फूट खोल दरीत कार कोसळली; मायलेकरांचा मृत्यू | पुढारी

सातारा : शिंगणापूर घाटात ४०० फूट खोल दरीत कार कोसळली; मायलेकरांचा मृत्यू

शिखर शिंगणापूर; पुढारी वृत्तसेवा

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी मृतांची नावे आहेत.

सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी आज (सोमवार) थदाळे या आपल्या मूळगावी आले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण नाशिककडे जात होते. पण शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फूट खोल दरीत त्‍यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले होते.

शिंगणापूर येथील ट्रेकर्स ग्रुप व युवकांनी 400 फूट खोल दरीतून मृतदेहवर काढले. हा भीषण अपघात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : थकलेल्या वृद्ध एसटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक ! | ST Workers senior citizens story

Back to top button