Patra Chawl case | संजय राऊतांना धक्का! प्रवीण राऊतांची ७३.६२ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त | पुढारी

Patra Chawl case | संजय राऊतांना धक्का! प्रवीण राऊतांची ७३.६२ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ कथित घोटाळ्याचा आरोप असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. प्रवीण राऊत यांची ७३.६२ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे. पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात प्रवीण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक जमिनींचा समावेश असलेलेली ७३.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडी मुंबईने तात्पुरती जप्त केली आहे. यामुळे या प्रकरणी एकूण जप्ती केलेली मालमत्ता ११६.२७ कोटी रुपये झाली असल्याचे ईडीने म्हटले आहे.

पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत यांना याआधी अटक झाली होती.

Back to top button