पिंपळनेर : बी.एड् शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा | पुढारी

पिंपळनेर : बी.एड् शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

पिंपळनेर, जि. धुळे : पुढारी वृत्तसेवा
परीक्षांचा कोणताही तणाव न घेता परीक्षांना सामोरे गेले पाहिजे, परिक्षा या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक गुणवत्तेचे आणि विकासाचे मूल्यमापन करणारे एक सर्वांत महत्त्वाचे तंत्र आहे. तसेच अध्ययन-अध्यापनाच्या परिणामाच्या मोजमापाचे साधन म्हणजेच परीक्षा होय. परीक्षा या तंत्राचा वापर व्यापक स्तरावर केला जातो. परिक्षेसाठी कोणताही मानसिक ताणतणाव निर्माण न येऊ देता आनंददायी पध्दतीने अध्ययन करुन समर्थपणे सामोरे गेले पाहिजे. परीक्षा हॉलमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ न देता परिक्षा दयावी असा सल्ला प्राचार्य डाॅ. सतीश पाटील यांनी केले.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न असलेल्या श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, (Smt M V M W College of Education Pimpalner) पिंपळनेरच्यावतीने “वार्षिक परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा” उद्घाटनप्रसंगी डाॅ. पाटील बोलत होते. याप्रंसगी प्रा. त्रिशिला साळवे, प्रा. वैशाली वेशी यांनी कार्यशाळेत पीपीटीद्वारे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा. त्रिशिला साळवे यांनी परीक्षांविषयक मार्गदर्शन करतांना सांगितले की, परीक्षेला सामोरे जात गुणवत्ता प्रस्थापित करता येते. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. परीक्षा कालावधीत केवळ विषयाचे ज्ञान आणि आकलनच तपासत नाहीत तर विद्यार्थ्यांना त्यांची प्रगल्भता आणि कमकुवतपणा ओळखण्यास मदत होते. कठीण समयी मार्ग काढण्यास सहकार्य होते. परीक्षा या शैक्षणिक प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोजमाप करण्याचे साधन म्हणून परीक्षा योग्य काम करतात. काही जण परीक्षांना तणाव आणि चिंतेचे कारण मानतात. परिक्षा या विद्यार्थ्यांना शिकण्यात आणि ज्ञान टिकवून ठेवण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. परीक्षा हा एक प्रकारचा शैक्षणिक क्रियाकलाप आहे. सराव परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण कसे उत्तरे मुद्देसुद लिहिले पाहिजेत यावर मार्गदर्शन करतात. वार्षिक परिक्षेसाठी त्यांना सक्षम करतात. अभिप्राय देखील दिला जातो. त्यामुळे कोणतीही भिती न बाळगता परिक्षा देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. (Smt M V M W College of Education Pimpalner)

कार्यकमाप्रसंगी प्रा. वैशाली वेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, काॅपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून कोणताही गैरप्रकार न होता परिक्षेची तयारी करुन तणावमुक्त परिक्षा दयावी म्हणजे आपणास भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. यावेळी काॅपीमुक्त अभियानावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम व द्वितीय वर्षाचे विदयार्थी शिक्षक, प्राध्यापकवृंद यांची कार्यशाळेस प्रामुख्यांने उपस्थिती होती. (Smt M V M W College of Education Pimpalner)

हेही वाचा:

Back to top button