Jalgaon Lok Sabha | शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल | पुढारी

Jalgaon Lok Sabha | शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे संजय राऊत, आ. शिरीष चौधरी, माजी खा. ईश्वरलाल जैन, रोहिणी खडसे, डॉ.सतीश पाटील यांच्या उपस्थित अर्ज दाखल केले. तर  वंचित बहुजन आघाडी कडूनही ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी आमदार सतीश पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, संजय राऊत, संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित उमेदवार करण पवार व श्रीराम पाटील यांनी अनुक्रमे जळगाव व रावेरसाठी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बैलगाडी ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने कलेक्टर ऑफिस जवळ जमत शक्ती प्रदर्शन केले. या ठिकाणी जयंत पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांची भाषणे झाली. त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास उमेदवार करण पवार व श्रीराम पाटील यांनी आपापल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा –

Back to top button