K Kavitha bail application: के. कविता यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीनावरील निकाल ठेवला राखून | पुढारी

K Kavitha bail application: के. कविता यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीनावरील निकाल ठेवला राखून

पुढारी ऑनलाईन डेस्क: बीआरएस नेत्या के. कविता यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता. यासाठी त्यांनी दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडे अर्ज केला होता. दरम्यान  राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज (दि.२२) दुसऱ्यांदा के.कविता यांच्या दिल्ली मद्य घोटाळा सीबीआय प्रकरणातील जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली. के.कविता यांच्या अंतरिम जामीनावरील याचिका गुरूवारी २ मे रोजी निकाली काढण्याचे आदेश  न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी सोमवार १५ एप्रिल रोजी के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोर्टाने पुढे छकलली होती. दरम्यान उद्या मंगळवार २३ एप्रिल रोजी के.कविता यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या आणि बीआरएस नेते के. आजही कविता यांना अद्याप तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही. सीबीआय प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने त्याच्या जामीनावरील निर्णय राखून ठेवला आहे. यावर न्यायालय आता गुरूवार २ मे रोजी  मे रोजी निकाल देणार आहे.

लोकसभेसाठी पक्षाच्या ‘स्टार प्रचारक’ म्हणून निवड

के. कविता यांनी याचिकेद्वारे अंतरिम दिलासा मागताना म्हटले आहे की, त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) तिला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांची ‘स्टार प्रचारक’ म्हणून घोषित केले आहे .यासाठी तिला शनिवार २० एप्रिल ते ११ मे या कालावधीत निवडणूक ड्युटी निर्धारित केली आहे, त्यामुळे निवडणुक प्रचारासाठी अर्ज करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (K. Kavita)

हे ही वाचा:

 

Back to top button