Nashik Massive Fire News | जुन्या नाशकात भीषण आगीत लाखोंचे नुकसान | पुढारी

Nashik Massive Fire News | जुन्या नाशकात भीषण आगीत लाखोंचे नुकसान

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा
चौक मंडई परीसरात सोमवार (दि.२२) रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे लोळ उठत असल्याने यामध्ये वाहन बाजारात उभी असलेली ४० ते ५० वाहने जळून खाक झाली असल्याचा प्रतिक्रिया प्रत्यक्ष दर्शिंनी दिली आहे. बाजूलाच असलेल्या चप्पल बूट गोदाम व स्पेअर पार्ट दुकानातील साहित्य देखील जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळते. सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. वाहन बाजार व गोदामच्या मागील बाजूस असलेली तीन घरे देखिल जळाल्याने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयसह, सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी येथील बंबांच्या साहाय्याने सुमारे दीड तासात भीषण आगिवर नियंत्रण मिळाले असून दाट लोकवस्ती व अरुंद रस्ते यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

जुने नाशिक pudhari.news       जुने नाशिक pudhari.news

पन्नास दुचाकींसह दोन घरे बेचिराख झाले असून नऊ बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

जुने नाशिक pudhari.news        जुने नाशिक pudhari.news

नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे ५० पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. आगीची सुरुवात या दुकानातूनच सकाळी सव्वा सातच्या सुमारास झाल्याचे नागरिक सांगत आहेत. अग्निशमन दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहचला. काही वेळेत या दुकानात अगदी लागून असलेल्या प्लॅस्टिक भांगर मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अशरफी स्पेअर पार्ट नावाने असलेल्या दुकानामधूनही धुराचे लोळ निघत होते. त्याचवेळी आग या दुकानांच्या पाठीमागे असलेल्या एजाज शेख व खैरुणीसा हनिफ सैय्यद यांच्या घरापर्यंत पोहचली. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली आहे. दुकानांसह दोन घरे आगीमध्ये राख झाली आहेत.

जुने नाशिक pudhari.news       जुने नाशिक pudhari.news

शॉर्टसर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती व ऑटोमोबाइल, भांगरमालाची दुकाने, गेरेज, वेल्डिंगची दुकानांनी व्यापलेला आहे. तर भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button