एस.टी. फुल्ल, स्थानकांवरही गर्दी : ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांकडे प्रवाशांची धाव | पुढारी

एस.टी. फुल्ल, स्थानकांवरही गर्दी : ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांकडे प्रवाशांची धाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुलांच्या परीक्षा संपल्यावर शाळांना सुट्या लागल्या आहेत. या उन्हाळी सुट्यांमुळे अनेक कुटुंब आपल्या मुलांसह गावी जात आहेत. त्यामुळे एस. टी.मध्ये प्रचंड गर्दी होते आहे. तसेच शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानके गर्दीने फुलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्या लागल्या की मामाच्या किंवा मूळ गावी जाण्याची ओढ लागते. त्यामुळे सध्या पुण्यात वास्तव्याला असलेली ग्रामीण भागातील अनेक कुटुंब गावाकडे जात आहेत. त्यामुळे रविवारी एस. टी. स्थानकांवर एरवीपेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळाली.

सध्या एसटीच्या ताफ्यात नव्या आरामदायी आणि वातानुकूलित गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी लांबच्या प्रवासासाठी खासगी वाहनाऐवजी एसटी बसने प्रवास करण्यावर भर देत आहेत. त्यातच राज्य शासनाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे एस.टी.ने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. त्यात शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे एस. टी. स्थानके गर्दीने फुललेली पाहायला मिळत आहेत. स्वारगेट बसस्थानक रविवारी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांनी तुडुंब भरले होते.

हेही वाचा

Back to top button