Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १७ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १७ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. यासाठी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ध्यान आणि चिंतनात घालवा. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आदर करा.

वृषभ : आज काही आव्हाने असू शकतात; परंतु तुम्ही आत्मविश्वासाने त्‍यांचा सामना कराल. प्रलंबित सरकारी का  मे प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सोडवता येतील. पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. मुलांमधील कोणत्याही नकारात्मक बाबींमुळे निराशा वाटेल. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.

मिथुन : आज कामाच्‍या व्‍यस्‍ततेतूनही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेण्यातही तुमची खूप मदत होईल. तरुणांना त्यांच्या करिअर परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. वाद टाळा.

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल होत आहे. आर्थिक नियोजनाशी संबंधित उद्दिष्ट पूर्ण होईल. धार्मिक संस्थांमध्ये तुमचे निस्वार्थ योगदान प्रतिष्ठा वाढवेल. नकारात्मक परिस्थितीचा शांतपणे सामना करा. राग आणि आक्रमकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. मुलांना प्रवेशाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायासंदर्भात स्‍वत: निर्णय घ्‍या.

सिंह : विशेष कौशल्यांपैकी एक शोधण्याचा प्रयत्न करा. तुमची प्रतिभाही लोकांसमोर येईल. घरामध्ये काही बदल किंवा सुधारणेची योजना करत असाल तर ही वेळ योग्य आहे. नियम पाळा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तरुणांनी नकारात्मक आणि चुकीच्या कामांपासून दूर राहावे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण प्रसन्न राहिल.

कन्या : आज मित्रांसोबत सलोखा राहील, असे श्रीगणेश सांगतात. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल. मुलांचे प्रश्न एकमेकांशी सल्लामसलत करून सोडवता येतील. विद्यार्थी आणि तरुण ध्येयाकडे दुर्लक्ष करतील. यामुळे त्यांच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकी यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

तूळ : तुमच्यासाठी सकारात्मक बदलांची वेळ येत आहे. काही अडचणीच्या वेळी नातेवाईकांचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सततच्या धावपळीतून आराम मिळू शकतो. भावनिक होऊन निर्णय घेवू नका अन्‍यथा समस्या निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत कमी होतील. मात्र लवकरच परिस्थिती अनुकूल होईल, असे श्रीगणेश सांगतात. आज तुमची ऊर्जा आणि तुमचे संपर्क विस्तारण्यासाठी वापरा.

वृश्चिक : आज दिवसाची सुरुवात यशस्वी होईल, असे श्रीगणेश सांगतात. राजकीय संपर्कातून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य प्रकारे हाताळू शकाल. जवळच्या व्यक्तीसोबत अप्रिय घटना घडू शकते. यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. संशयाची भावना नातेसंबंध खराब करू शकते. त्‍यामुळे आपल्या वर्तनात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. माध्यम, कला, प्रकाशन इत्यादी क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते.

धनु : आज स्‍वत:च्‍या क्षमतांवर विश्‍वास ठेवा. नवीन कार्ये योग्यरित्या अंमलात आणा. पैशाशी संबंधित काही गुंतवणूक योजना तयार होतील. मात्र घाई आणि निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. व्यवहारात लवचिक राहा. काळ अनुकूल आहे. तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन दिवसाच्या सुरुवातीपासूनच करा. थकवा आणि नकारात्मकतेमुळे मनोबल कमी होऊ शकते.

मकर : सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात आज तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, असे श्रीगणेश सांगतात. शांततेसाठी थोडा वेळ एकांतात किंवा धार्मिक स्थळी व्‍यतित करणे आवश्‍यक. महत्त्वाचा निर्णय घेण्‍यापूर्वी योग्य विचार करा. वाचल्याशिवाय कोणतीही कागदपत्रांवर सही करु नका. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

कुंभ : घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुमचा समाजात आणि कुटुंबात आदर वाढेवेल. युवकांनी आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले तर यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. विनाकारण इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.

मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक शांती लाभेल. काही आर्थिक गोंधळ आणि समस्या असू शकतात. एखाद्याची नकारात्मक कृती तुम्हाला भावनिकदृष्ट्या असुरक्षित बनवू शकते. कामाच्या पद्धतीत बदल सकारात्मक राहील. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

Back to top button