भाग्यश्री सुडे खून प्रकरण; आरोपींच्या कोठडीत वाढ | पुढारी

भाग्यश्री सुडे खून प्रकरण; आरोपींच्या कोठडीत वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाघोली परिसरात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या भाग्यश्री सुडे खून प्रकरणात आरोपींच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. शिवम माधव फुलवळे (वय 21, रा. वाघोली, पुणे; मु. रा. नांदेड), सुरेश शिवाजी इंदुरे (वय 23, रा. सकनूर, ता. मुखेड, नांदेड) व सागर रमेश जाधव (रा. हलकी, ता. शिरोळा, लातूर) या तिघांना तरुणीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तिघांची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (दि. 15) संपल्याने त्यांना तपास अधिकारी सर्जेराव कुंभार यांनी न्यायालयात हजर केले.

या वेळी सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी युक्तिवाद केला. भाग्यश्री हिचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेला स्टिकगिग टेप आणि कारच्या काचांना लावण्यासाठी खरेदी केलेले काळ्या रंगाचे मॅग्नेटिक कर्टन्स कुठून खरेदी केले आहेत, ती ठिकाणे आरोपींनी दाखविली आहेत, तसेच तिचा मृतदेह खड्डा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात दिली.

हेही वाचा

Back to top button