AAP On BJP: केजरीवालांचे मनोधैर्य खचवण्याचे तुरुंगात प्रयत्न; AAP चा आरोप | पुढारी

AAP On BJP: केजरीवालांचे मनोधैर्य खचवण्याचे तुरुंगात प्रयत्न; AAP चा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण मनी लॉड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान त्यांचे मनोधैर्य खचण्यासाठी २४ तास प्रयत्न केले जात आहेत. असा आरोप आम आदमी पक्षाचे विधानसभा खासदार संजय सिंह यांनी भाजप आणि सत्ताधारी मोदी सरकारवर केला आहे. ते आज (दि.१६) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (AAP On BJP)

लोकसभा सभेत मुख्यमंत्री भगवंत मान भावूक

संजय सिंह यांनी म्हटले आहे की, तुम्ही अरविंद केजरीवाल यांना जितके तोडण्याचा प्रयत्न कराल, ते तितक्याच वेगाने पुढे येतील. कारण ते एका वेगळ्याच मातीचे बनलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काल एका लोकसभा प्रचार सभेत मुख्यमंत्री भगवंत मान भावूक झाले, ही आपल्या सर्वांसाठी भावनिक बाब आहे, पण भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी ही लाजिरवाणी बाब आहे, असेही खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (AAP On BJP)

AAP On BJP: PM मोदींच्या मनात केजरीवालांबद्दल द्वेष- आप

“देशासाठी आणि दिल्लीच्या लोकांसाठी एका मुलाप्रमाणे आणि भावाप्रमाणे काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून ‘माझे नाव अरविंद केजरीवाल आहे आणि मी दहशतवादी नाही’ असा संदेश देशवासियांना दिला आहे. दिल्लीचे तीनवेळा निवडून आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना एका काचेतून भेटले आहेत. यावरून पंतप्रधानांच्या मनात अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल द्वेषाची भावना असल्याचे स्पष्ट होते, असेही आप खासदार संजय सिंह म्हणतात. (AAP On BJP)

हे ही वाचा:

Back to top button