भाजपचे संकल्पपत्र हा ‘विकसित भारता’चा रोडमॅप : माधव भांडारी यांचे मत | पुढारी

भाजपचे संकल्पपत्र हा ‘विकसित भारता’चा रोडमॅप : माधव भांडारी यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेले ‘संकल्पपत्र’ हे विकसित भारताचा रोड मॅप आहे, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी (दि.15) पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. भांडारी म्हणाले, पंधरा लाख लोकांनी त्यांच्या अपेक्षा कळविल्या होत्या. गेल्या दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता केलेल्या विकासकामांचा आणि योजनांचा आढावा या संकल्पपत्रात घेतला आहे. अशा पद्धतीचा अहवाल अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आत्तापर्यंत मांडलेला नाही.

ते दरवेळी केवळ नवीन जाहीरनामा प्रसिद्ध करतात. भाजपने केलेली कामे सांगतानाच भविष्यातील भारताच्या विकासाचा संकल्प केला आहे. भांडारी म्हणाले, पुढील 25 वर्षांत भारत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे करण्याचा संकल्प आपण करत आहोत. त्यामध्ये युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्याच्या योजनांवर, रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात निश्चित केले आहे. समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे.

हेही वाचा

Back to top button