परभणी : पूर्णा तालूक्यात अवकाळी पावसाची हजेरी | पुढारी

परभणी : पूर्णा तालूक्यात अवकाळी पावसाची हजेरी

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : शहर व तालुका परिसरात आज (दि.९) गुढीपाडव्याच्या शुभमुर्हतावर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. परिसरात सायंकाळी ५ च्या दरम्यान वादळी- वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदार, फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सध्या शेतात हळद काढणी व वाळवणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अवकाळी पावसामुळे हळद काढणीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button