Kangana Ranaut : ‘पहिले पंतप्रधान…’ टिप्पणीबद्दल नेताजींच्या कुटुंबीयांनी कंगनाला फटकारले | पुढारी

 Kangana Ranaut : 'पहिले पंतप्रधान...' टिप्पणीबद्दल नेताजींच्या कुटुंबीयांनी कंगनाला फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : “नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान…” अशी टीपण्णी केल्याबद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटूंबाने अभिनेत्री आणि मंडी लाेकसभा मतदारसंघातील भाजपच्‍या उमेदवार  कंगना रणौत यांना फटकारले आहे. सुभाषचंद्र बोस यांचे पणतू, भाजपचे माजी नेते चंद्र कुमार बोस यांनी आपल्‍या  ‘X’ अकाउंटवर आपलं मत मांडलं आहे.  ( Kangana Ranaut )

काय म्‍हणाल्‍या हाेत्‍या कंगना रणौत?

 एका कार्यक्रमात बोलताना कंगना रणौत म्‍हटलं हाेतं की, “भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस हाेते.  या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र कमेंट भावना व्यक्त केल्या जावू लागल्या आहेत.  कॉंग्रेसने त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उठवली आहे.

नेहरू आणि काँग्रेसशी स्पर्धा करण्यासाठी नेताजींचा वापर

कंगना यांच्‍या विधानावर सुभाषचंद्र बोस यांचे पणतू आणि भाजपचे माजी नेते चंद्र कुमार बोस यांनी आपल्या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “कोणीही इतिहासाचा विपर्यास करू नये. राजकीय फायद्यासाठी बोसचा वारसा हाताळण्याचा प्रयत्न आहे. बंगाल आणि पंजाबच्या फाळणीनंतर नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. हा इतिहास आहे. हे कोणीही बदलू शकत नाही. नेहरू आणि काँग्रेसशी स्पर्धा करण्यासाठी नेताजींचा वापर केला जात आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. चंद्र बोस असेही म्हणाले की, “नेताजी आणि नेहरू यांच्यात मतभेद असले तरी ते एकमेकांचा आदर करत होते. तसे झाले नसते तर नेताजींनी आझाद हिंद फौजेच्या ब्रिगेडचे नाव नेहरू आणि गांधी यांच्या नावावरुन  ठेवले नसते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा 

Back to top button