धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक | पुढारी

धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाणे लोकसभेसाठी धन्युष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकाराची ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केला आहे. दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचालवल्या आहेत.

संबंधित बातम्या 

ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अद्याप कायम असल्याने या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे.

तर भाजप कडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. नाईक यांच्या या ‘ठाणे’वारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत.

Back to top button