मृत मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्याय मिळेपर्यंत पाठीशी : मंत्री आठवले | पुढारी

मृत मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्याय मिळेपर्यंत पाठीशी : मंत्री आठवले

आश्वी : पुढारी वृत्तसेवा : साकूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण गंभीर आहे. खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी. पिडित मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे सांगत, साकूरमध्ये पोलिस चौकी सुरु करावी, यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भ्रमणध्वनीवरुन सांगितले. दरम्यान, पिडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना, ‘मी तुमच्या पाठिशी न्याय मिळेपर्यंत उभा राहिल, अशी ग्वाही मंत्री आठवले यांनी दिली.

दहावीत शिकणार्‍या मुलीवर साथीदारांच्या मदतीने नराधमाने अत्याचार केला. या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलीने जीवन यात्रा संपविली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाईं पदाधिकार्‍यांनी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री आठवले भ्रमणध्वनीवरुन बोलत होते. राजकीय दबावाखाली येथे पोलिस स्टेशन होत नसल्याचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके म्हणाले.
यावेळी विजय खरात, बाळासाहेब कदम, अमोल राखपसरे, संपत भोसले, गौतम वर्पे, पत्रकार राजेश गायकवाड उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button