कच्ची केळी आरोग्यासाठी गुणकारी | पुढारी

कच्ची केळी आरोग्यासाठी गुणकारी

नवी दिल्ली : कच्ची केळी सामान्यतः बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात; कारण विक्रेते सहसा पिकण्याआधीच केळी झाडावरून तोडून आणतात. हिरव्या केळ्यांमधील पोषकसत्त्वही पिकलेल्या केळ्यांपेक्षा वेगळी असतात; कारण त्यात जास्त प्रतिरोधक स्टार्च आणि कमी साखर असते. फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे घटक सुद्धा या कच्च्या केळ्यांमध्ये अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे कच्ची केळी आरोग्यासाठी अधिक गुणकारी ठरतात.

कच्च्या केळ्यातील फायबर हे पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे वारंवार खाण्याचे प्रमाण कमी होते तसेच शरीरात विनाकारण ढकलल्या जाणार्‍या कॅलरिज सुद्धा नियंत्रणात राहतात. हिरव्या केळ्यांमध्ये आढळणारा प्रतिरोधक स्टार्च हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, जो एक प्रीबायोटिक म्हणून काम करतो जे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करते. तसेच हिरवी केळी शॉर्ट-चेन फॅटी ऍसिडचे उत्पादन वाढवतात ज्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या पचन समस्या असलेल्या व्यक्तींसाठी आहारात हिरव्या केळीचा समावेश केल्याने आराम मिळू शकतो व आणि पचन विकारांशी संबंधित लक्षणे दूर होऊ शकतात.

Back to top button