धक्कादायक : रक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनींचा विनयभंग | पुढारी

धक्कादायक : रक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनींचा विनयभंग

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : एका सामाजिक संस्थेने केलेल्या प्रबोधनातून शालेय मुलींचा विनयभंग करणार्‍या शिक्षकावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित शिक्षकाचे तातडीने निलंबन केले होते. मात्र, अद्याप सरकारी फिर्याद का दिली नाही? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेला शिक्षक हा पसार झाला आहे. प्रवीण दिनकर बोबडे असे गुन्हा दखल असलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोर तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालकांनी संबंधित शिक्षकाला चोप देत गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार दिल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. वास्तविक, हा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता, तरी देखील भोर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पोलिसांना का कळविले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. भोर पंचायत समितीतील अधिकारी पत्रकारांना उडवाउडवीची कारणे देऊन माहिती लपविण्यात आली होती. भोर तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत मगुड टच बॅड टचफबाबत शालेय विद्यार्थिनींचे प्रबोधन केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईला आरोपी शिक्षक शारीरिक छेड करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर चार ते पाच मुलींसोबत देखील असाच प्रकार घडल्याचे उजेडात आले.

अल्पवयीन शालेय मुलींबाबत असा निंदनीय प्रकार घडल्यानंतर तातडीने पालकांनी आणि संबंधित शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी पोलिसात तक्रार दाखल करणे गरजेचे होते. याप्रकरणी पीडित मुलींची नावे गुप्त ठेवून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– राजेश गवळी, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे

हेही वाचा

Back to top button