कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी तरूणाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी तरूणाचा मृत्यू

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : गारगोटी- कोल्हापूर मार्गावर बिद्री ते मुदाळतिट्टा दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली होती. यामध्ये मोटरसायकलवरील तरूण गंभीर जखमी झाला होता. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (दि.२९) त्यांचा मृत्यू झाला. विश्वजीत मारुती गायकवाड (वय ५४, रा. बिद्री ता. कागल) असे या तरूणाचे नाव आहे. याबाबतची नोंद कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांत व मुरगूड पोलिसांत झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, २१ मे रोजी बिद्री येथील विश्वजीत गायकवाड हा तरूण मुदाळतिट्यावरून बिद्रीकडे रात्री पावणेआठच्या दरम्यान मोटरसायकलने घरी येत होता. बिद्रीच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वहानांने त्याच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (बुधवारी) उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदानानंतर मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बिद्री येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विश्वजीत हा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील व मनमिळावू स्वभावाचा होता. सेंट्रींग व्यवसायाशी संबधित तो काम करत होता. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button