दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर जर्मनीने यावर टिप्पणी करताना म्हटले होते की, जर्मन सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके, मूलभूत लोकशाही तत्त्वे या प्रकरणात देखील लागू होतील. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याचा अधिकार आहे, असेही जर्मनीने म्हटले होते. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एन्झ्वेलर यांना बोलावून जर्मनीच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. Arvind Kejriwal Arrest